जळगांव – दि.५ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) शहरातील जेडीसीसी डायरेक्टर बंगलो-शिनूबंगलो कॉलनी,एस.एम.आय.टी.कॉलेज जवळ नवीनच उभारलेल्या सिद्धिविनायक महिला मंडळ संचलित सिद्धि विनायक गणपती मंदिरात कृष्णशिळा (काळापाषाण) दगडामधील गणेश मूर्ती(राम मंदिर अयोध्या मधील मूर्ती घडवलेल्या कारागीरांकडून)मंदिरात उद्या दि.६ रोजी रोजी अंगारक चतुर्थी निमित्त गणेशभक्तांना दर्शनासाठी
मंदिर दिवसभर खुले असणार आहे.
सिद्धिविनायक गणपती मंदिरात अंगारक चतुर्थी निमित्त दर्शनासाठी सकाळी ५ ते रात्री १० मंदिर भाविकांसाठी खुले राहणार आहे.सकाळी ८ वाजता मंदिरात गणपतीचा अभिषेक होईल तसेंच दिवसभर विविध फराळाचे पदार्थ आणि केळी प्रसाद दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी दिला जाणार आहे.
सायंकाळी ७.५५ मिनिटांनी महाआरतीची वेळ राहील महाआरती नंतर ५० किलोची साबुदाणा खिचडीचे भक्तांसाठी वाटप होईल तरी जळगाव मधील सर्व गणेश भक्तांनी दर्शनाचा व महाआरतीसाठी उपस्थिती देवून प्रसादाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन सिद्धिविनायक महिला मंडळकडून करण्यात आले आहे.
एस.एम.आय.टी कॉलेज परिसरातील नूतन सिद्धीविनायक गणेश मंदिर उद्या दि.६ अंगारकी चतुर्थीला भाविकांसाठी दिवसभर खुले
RELATED ARTICLES
