Thursday, January 15, 2026
Homeजळगांव शहरउसळला गर्दीचा जनसागर..महायुती तर्फे नितीन लढ्ढा यांच्या नेतृत्वात प्रभाग ५ साठी ...

उसळला गर्दीचा जनसागर..महायुती तर्फे नितीन लढ्ढा यांच्या नेतृत्वात प्रभाग ५ साठी विजयाचा संकल्प…महारॅलीने प्रभाग वासियांचे चित्त वेधले…

जळगांव – दि.१२ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
नितीन लढ्ढा,समवेत प्रभाग ५ मधील महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी भव्य महारॅलीने विजयाचा संकल्प करण्यात आला.या उत्स्फूर्त सहभाग महारॅलीने प्रभागासह शहरातील नागरिकांचे चित्त वेधले.क्रमांक ५ प्रभागातील महायुती उमेदवारांच्या समर्थनार्थ आज दि.१२ रोजी दुपारी ४.वाजता गोलाणी मार्केट जवळील श्री हनुमान मंदिरात राज्याचे मंत्री श्री गिरीश महाजन यांच्या शुभ हस्ते श्रीफळ फोडून भव्य रॅलीचा शुभारंभ करण्यात आला.या प्रसंगी खा.स्मिता वाघ,आ.राजू मामा भोळे,शिंदेसेनेचे आमदार चंद्रकांत सोनवणे,प्रदीप रायसोनी,राष्ट्रवादी कांग्रेसचे मनीष जैन,लक्ष्मीकांत चौधरी,प्रभाग -५ मधील अनुभवी नेतृत्व भाजपा उमेदवार नितीन लढ्ढा,शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे,महिलाा उमेदवार सौ.आशा रमेश पाटील,सौ.मंगला चौधरी,डॉ.उल्हास पाटील,सुनील झंवर,मनीष झंवर,राजू दोशी,स्वरूप लुंकड चंद्रशेेेखर वाणी,राजू दोशी, उद्योजक भागवत भंगाळे,जििल्हा केमिस्ट जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे,सागर भंगाळे,आकाश भंगाळे,लखीचंद जैन,पवन जैन,प्रदीप वेद,प्रकाश वाणी,स्वप्नील रडे,संदीप रडे,रवी रडे,समीर गुळवे,प्रकाश चव्हाण, दिपक चौधरी,वैभव तायडे ,रितेश चौधरी,ह्यांच्या सह असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ह्या भव्य प्रचार रॅलीची सुरुवात होण्यापूर्वी मंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव महापालिका निवडणुकीत महायुतीच्या मोठ्या विजयाची खात्री देत महापलिका निवडणूक साठी सर्व कार्यकर्ते सज्ज असून महायुतीच्या माध्यमातून लोकांच्या मनातील काम करणारे उमेदवार घवघवीत मतांनी विजयी होतील याचा विश्वास असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.या प्रसंगी मंदिर परिसरातील वातावरण भगवामय झाले होते.प्रभागातील विविध क्षेत्रातील मान्यवर,उद्योजक,
व्यावसायिक नितीन लढ्ढा मित्र परिवार सदस्य,नवी पेठ गणेश मंडळाचे कार्यकर्ते,महिला वर्ग,महायुती तील घटक पक्षाच्या महिला,पदाधिकारी,युवा कार्यकर्ते ,केमिस्ट बांधव,प्रभागातील महायुतीवर प्रेम करणारे रहिवासी मोठ्या संख्येने ह्या रॅलीत सहभागी झाले होते.त्यामुळे महायुती कार्यकर्त्यात उत्साहाचे वातावरण पसरले होते.श्री हनुमान मंदिर येथून निघालेली ही रॅली पतंजली गल्ली,गायत्री मंदिर,विसनजी नगर मार्गे,लगतचा परिसर,विष्णू भंगाळे यांचे निवास स्थान मार्गे,पांडे डेअरी,तुकाराम वाडी परिसर असा प्रवास पूर्ण करीत असताना ठिकठिकाणी उमेदवारांचे फटाक्यांच्या आतिषबाजीने उत्स्फूर्त स्वागत करण्यात येत होते,पुष्प वर्षाव केला जात होता.घरोघरी त्यांचे औक्षण केले जात होते.त्यांना जेष्ठ मंडळींकडून विजयाचा आशिर्वाद दिला जात होता.अतिशय भव्य स्वरुपात ही रॅली मोठ्या संख्येने निघाल्याने शहरात या बाबत चर्चा होत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या