Thursday, January 15, 2026
Homeजळगांव शहरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगावात..महायुती उमेदवारांच्या प्रचारासाठी भव्य रोड शो..

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगावात..महायुती उमेदवारांच्या प्रचारासाठी भव्य रोड शो..

जळगांव – दि.८ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना (शिंदे गटाचे) प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांचे आज दि.८ रोजी दुपारी १ वाजता जळगावात आगमन होत आहे. महायुती उमेदवारांच्या प्रचारासाठी भव्य रोड शो चे आयोजन शहरात करण्यात आले आहे.प्रशासना तर्फे या दौऱ्याची चोख व्यवस्था ठेवली जात आहे.मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.नो फ्लायिंग झोन घोषित करण्यात आला आहे.संपूर्ण जिल्हाभरातून शिवसेना नेते शिवसैनिक ,पदाधिकारी या भव्य रोड शो मध्ये सहभागी होत आहेत .शिवाजी पुतळा,चित्रा चौक,भंगाळे गोल्ड चौक,सुभाष चौक,शास्त्री टॉवर,मार्गे रेल्वे स्टेशन अश्या पद्धतीने रोड शो होणार आहे.त्यानंतर ते पत्रकारांशी जळगाव महापालिका निवडणूक संदर्भात संवाद साधणार आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या