जळगाव : दि.२ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)
जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीला प्रारंभापासून प्रभाव सिद्ध करणारी आघाडी मिळत आहे. महायुतीमधील भाजपने उज्वला ताईंच्या रूपाने खाते उघडल्यानंतर आता आणखी एक जागा बिनविरोध झाली असून प्रभाग क्रमांक ७-क मधून आमदार राजूमामा भोळे यांचे सुपुत्र विशाल भोळे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.
विशाल भोळे यांच्या रूपात तरुण तडफदार व वडिलांचा वारसा असलेले कार्यकर्ता व्यक्तिमत्त्व प्रभागातील समस्या सक्षमतेने सोडवेल अशी प्रतिक्रिया भाजपा कार्यकर्ते व्यक्त करीत आहे.
त्यामुळे भाजपच्या बिनविरोध जागांचा आकडा आता दोन झाला आहे. एकूणच महायुतीच्या आतापर्यंत आठ जागा बिनविरोध झाल्याने विरोधक यांच्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
आ.राजू मामा भोळे यांचे सुपुत्र..प्रभाग क्रमांक ७ -क मधून विशाल भोळे बिनविरोध..
RELATED ARTICLES
