जळगांव – दि.५ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)येथील ईस्ट खानदेश एज्युकेशन सोसायटी संचालित आर.आर.विद्यालयातील संगीत शिक्षक श्री. संजय भास्कर क्षीरसागर यांना सन २०२५ या वर्षाचा आदर्श शिक्षक पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेल तर्फे जाहीर करण्यात आला आहे.संजय क्षीरसागर हे (B.A) संगीत विशारद असून त्यांनी (M.A.) संगीत ही पदवी मिळवली आहे. त्यांचे विशेष उल्लेखनीय कार्य म्हणजे ३०० विद्यार्थ्याचा शाळेत असणारा स्वररंग हा वाद्यवृंद कार्यक्रम प्रसिद्ध आहे.जिल्ह्यातील पहिले 50 मुलींचे ढोलपथक सादरीकरण मनोवेधक आहे.350 विद्यार्थ्यांचे पाऊस गाणी वाद्यवृंदासह आकर्षक व मनमोहक पद्धतीने सादरीकरण करत असतात.
विविध संस्थांच्या गायन स्पर्धेत विद्यार्थी दरवर्षी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावत असतात. इयत्ता पाचवी ते आठवी मराठी पाठ्य पुस्तकातील कवितांना चाली लावून 250 विद्यार्थ्याचा सुंदर गायनाचा कार्यक्रम ते सादर करत असतात. ईश स्तवन , विज्ञान गीते सादर करून शालेय विद्यार्थ्यांचा गीत मंच हा कार्यक्रम दरवर्षी सादर करण्यात येत असतो.
आर.आर.विद्यालयातील संगीत शिक्षक संजय क्षीरसागर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.
RELATED ARTICLES