Thursday, April 2, 2026
Homeजळगांव शहरआझाद क्रीडा सांस्कृतिक मंडळ पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक भाऊंची भेट..चर्चा करीत केले मार्गदर्शन..

आझाद क्रीडा सांस्कृतिक मंडळ पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक भाऊंची भेट..चर्चा करीत केले मार्गदर्शन..

जळगांव – दि.२६ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)जळगांव शहरातील गणेशोत्सवात विविधांगी विषयातून समाज प्रबोधन करणाऱ्या भव्य व आकर्षक स्वरूपात आरासी साठी प्रसिद्ध असलेल्या आझाद क्रीडा व सांस्कृतिक मंडळ पदाधिकारी यांनी आज दुपारी जैन इरिगेशन सिस्टीम ली.चे चेअरमन अशोकभाऊ जैन यांची भेट घेवून त्यांना यंदाच्या गणेशोत्सवात परम संगणक आरासीला भेट देण्यासाठी व श्रींच्या महाआरतीसाठी सहभागाचे आमंत्रण दिले. .याप्रसंगी जैन इरिगेशन सि.ली.चे मीडिया प्रमुख अनिल जोशी यांची देखील उपस्थिती होती.

या प्रसंगी बळीराम पेठेचे भूषण जळगावचा चिंतामणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रीडा व सांस्कृतिक मंडळातर्फे दरवर्षी नवीन विषयावर समाजाला वैचारिक बळ मिळावे,युवा वर्गाला आपल्या देशाच्या गगनाला भरारी घालणाऱ्या विकासात्मक वाटचालीची,क्षमतेची सकारात्मक माहिती समजावी त्यातून आरास हे प्रभावी माध्यम ठरत असल्याने नाविन्याचा ध्यास घेत आम्ही कार्यरत आहोत व त्यात आम्हाला दरवर्षी समाजातील विविध स्तरातून भरभरून प्रतिसाद लाभत असल्याची माहिती गतिशील व प्रभावी नेतृत्व करणारे अध्यक्ष आश्विन भोळे यांनी अशोक भाऊंना देवून यंदाच्या परम संगणक सुपर कॉम्प्युटर या भव्य आरासीला प्रभावी स्वरूप देण्याबाबत बाबत त्यांचे मौलिक मार्गदर्शन घेतले.तसेच दरवर्षीच्या आकर्षण ठरणाऱ्या जळगावच्या चिंतामणीचे आगमन सोहळ्याची व्याप्ती समोर मांडली.अशोक भाऊ यांनी मंडळाच्या कार्याचे कौतुक करत अशीच वाटचाल सुरू ठेवा व समाजाला प्रेरित करण्याचे दिशादायी कार्य करत रहा असे सांगत अभिनंदन केले.तसेच मंडळाला सर्वतोपरी  मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

या प्रसंगी मंडळाचे ललित भोळे,राहुल घोरपडे,महेंद्र विरपनकर,राज चंदनकर,मयूर रतवेकर,धर्मसाथीचे प्रसाद जोशी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या