जळगांव – दि २८ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) बळीराम पेठ परिसरातील सकल हिंदू समाजाच्या वतीने आज शनिवार दि.२८ मार्च रोजी बळीराम पेठेतील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात सायंकाळी ठीक ६ वाजता “विराट हिंदू मेळाव्या“चे उत्साही आयोजन करण्यात आले आहे.
या विराट हिंदू मेळाव्याला आशिर्वचन देण्यासाठी कानळदा येथील प्राचीन कण्वाश्रमाचे विद्यमान गादीपती अद्वैतानंदजी स्वामी हे उपस्थित राहणार आहेत.यावेळी प्रमुख वक्ते देवेंद्र भावसार(विश्व हिंदू परिषद- विभाग मंत्री)असून अध्यक्ष स्थानी प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या तसेच ज्येष्ठ पत्रकार सौ.शांता ताई वाणी या आहेत.
आझाद क्रीडा व सांस्कृतिक मंडळ वतीने महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन…
“जळगावचा चिंतामणी” आझाद क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळाच्या वतीने मेळावा संपन्न झाल्यावर रात्री 8.30 वा.महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.यात मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सेवा देण्यासाठी सहभागी होणार आहे.सदर मेळावा यशस्वी व्हावा यासाठी बळीराम पेठेतील सर्व सामाजिक कार्यकर्ते ,महिला,युवक तसेच गणेश मंडळ,देवी मंडळांचे कार्यकर्ते,परिसरातील विविध देवस्थानचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.
