जळगाव दि. १३ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) – जिल्हाधिकारी कार्यालय,जळगाव व परिवर्तन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशभक्तीपर गीतांचा “हर घर तिरंगा” हा संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम १४ ऑगस्ट २०२५ रोजी गुरुवारी सायं.६.३० वाजता अल्प बचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे होणार आहे.
कार्यक्रम निर्मिती प्रमुख अनिल कांकरिया व अमर कुकरेजा असून सर्वांसाठी हा कार्यक्रम खुला आहे. जिल्हावासीयांनी उपस्थित राहून देशभक्तीच्या स्वरांनी मन भारावून टाकण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अल्पबचत भवन मध्ये स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला “हर घर तिरंगा” संगीतमय सोहळा
RELATED ARTICLES
